मुख पृष्ठ » Top Links » आमच्या बद्दल » तुमच्या आयुर्विम्याबद्दल जाणून घ्या
तुमच्या आयुर्विम्याबद्दल जाणून घ्या

तुमच्या आयुर्विम्याबद्दल जाणून घ्या

भारतामध्ये आयुर्विम्याने पदार्पण १०० वर्षापूर्वी केले.

आपल्या देशामध्ये, जो जगातील सर्वात जास्त लोकसंख्येच्यापैकी आहे, विम्याचे महत्व जितक्या व्यापकरित्या पाहिजे, तितके समजले जात नाही. पुढे आहे तो वाचकाला आयुर्विम्याच्या काही संकल्पनांचा परिचय करून देण्याचा एक प्रयत्न. विशेषत: एलआयसी बद्दल. तथापी हे लक्षात घेतले पाहिजे की, पुढील सामग्री कोणत्याही अर्थाने एखाद्या एलआयसीच्या पॉलिसीच्या शर्ती आणि अटीं किंवा लाभ किंवा अधिकारांचे विस्तृत वर्णन नाही  

अधिक तपशीलासाठी, कृपया आमच्या शाखा किंवा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधा. एलआयसीचा एजंट तुमच्या गरजा भागवणा-या आयुर्विमा पॉलिसीच्या निवडीमध्ये आणि पॉलिसीच्या सेवा देण्यामध्ये तुम्हाला मदत करेल.
 
आयुर्विमा काय आहे?

आयुर्विमा एक करार आहे जो विमाकर्त्याला (किंवा त्याच्या वारसाला) त्याच्याशी घडणा-या विपरीत घटनेच्या बाबतीत एक रक्कम देण्याचे आश्वासन देतो.

विम्याची रक्कम खालील निर्दीष्ट घटनांमध्ये वैध आहे.
»परिपक्वतेची तारीख, किंवा
»नियमीत अंतराच्या निर्दिष्ट तारखा, किंवा
»दुर्दैवाने जर आधी मृत्यु आल्यास.

इतर गोष्टींच्या बाबतीत, करारामध्ये पॉलिसीधारकाने महामंडळाकडे नियमीतपणे विम्याचे हप्ते भरण्याची तरतूद आहे. आयुर्विमा सर्वत्र एक संस्था म्हणून मानली जाते, जी ’जोखीम’ कमी करते, अनिश्चिततेला निश्चिततेमध्ये बदलते आणि कर्त्यामाणसाच्या दुर्दैवी मृत्युच्या बाबतीत कुटुंबाच्या मदतीला ऎनवेळी धावून येते सर्वपरिस्थिती लक्षात घेता, मृत्युमुळे निर्माण झालेल्या प्रश्नाचे आयुर्विमा हे अंशत: समाधान आहे.  


थोडक्यात आयुर्विमा, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या मार्गावर उभ्या ठाकलेल्या दोन धोक्यांशी संबंधीत आहे:

1. तो जो अकाली मृत्युने अवलंबून असणा-या कुंटुंबाला त्यांच्या स्वत:च्या निर्वाहावर सोडून देण्याचा.
2. कोंणत्याही दृष्य आधार सामग्रीशिवाय उतारवयापर्यंत जगण्याचा.

 

 
आयुर्विमा विरूद्ध विम्याचे इतर/ बचतीचे उपाय:

विम्याचे करार:
विम्याचा करार हा एक पराकोटीच्या विश्वासाचा करार आहे, तांत्रीक दृष्ट्या तो ’Uberrima fides’ म्हणून ओळखला जातो. सर्व वस्तुस्थिती उघडकरण्याची शिकवण या महत्वाच्या तत्वामध्ये अंतर्भूत आहे, जी सर्व विमा प्रकारांना लागू होते.

पॉलिसी घेत असताना, पॉलिसीधारकाने ही खात्री करून घेतली पाहिजे की, प्रस्तावाच्या फॉर्ममधील सर्व प्रश्नांची उत्तरे अचूकपणे देण्यात आलेली आहेत. एखाद्या दस्तऎवजामधील कोणतीही चूक, माहिती न देणे किंवा फसवणूक, स्विकारण्यात येणा-या जोखीमी प्रति जावून विमा करार रद्द बातल ठरवणारी असेल.

संरक्षण:
आयुर्विम्याच्या मार्फत केलेली बचत बचतकर्त्याच्या मृत्युच्या बाबतीत जोखीमीपासून पूर्ण संरक्षणाची हमी देते. त्याच प्रमाणे मृत्यु झाल्यास आयुर्विमा, खात्री देण्यात आलेली (सर्व लागू बोनससह) सर्व रक्कम देण्याची हमी देते, याउलट इतर बचत योजनेत, फक्त बचतीची रक्कम (व्याजासहित) देय होते.

काटकसरीला मदत:
आयुर्विमा काटकसरीला प्रोत्साहन देतो. योजनेमधील अंतर्भूत ’सोप्या हप्त्या’च्या सोईमुळे (विम्यासाठीचे विम्याचेहप्ते एकतर मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक असतात) कष्टाशिवाय पैसे भरता येऊ शकत असल्यामुळे दिर्धकालीन बचत करता येते.
उदाहरणा दाखल: एसएसएस म्हणून सुप्रसिद्ध असलेली पगार बचत योजना, एखाद्याच्या पगारातून दरमहा विम्याचा हप्ता भरण्याची सोईस्कर पद्धत प्रदान करते.
या बाबतीत नियोक्ता वजावट करण्यात आलेला विम्याचा हप्ता थेट एलआयसीला देतो. निर्दिष्ट शर्ती आणि अटींच्या अधीन राहून पगार बचत योजना कोणत्याही संस्थेला किंवा आस्थापनेसाठी आदर्श आहे
तरलता:
विम्याच्या बाबतील, कर्ज मुल्य प्राप्त झालेल्या कोणत्याही पॉलिसीवर कर्ज मिळवणे सोपे आहे. याशिवाय आयुर्विमा पॉलिसी सर्वसाधारणपणे तारण म्हणून स्विकारली जाते, एखाद्या व्यापारी कर्जांच्या बाबतीत सुद्धा.

कर भरण्यापासून मुक्तता :
आयकर आणि संपत्तीकरावरील वजावटी उपभोगण्याचा आयुर्विमा हा सर्वोत्तम मार्ग आहे. प्रभावी असलेल्या आयकराच्या दरांच्या अधीन राहून भरण्यात आलेल्या विमाह्प्त्याच्या स्वरूपातील रकमांसाठी तो उपलब्ध आहे. करदाते करमुक्ततेसाठी कायद्यातील तरतूदी सुद्धा प्राप्त करू शकतात. अशा बाबतीत प्रत्यक्षात विमाकर्ता अन्यथा विम्यापेक्षा कमी असलेला विम्याचा हप्ता देत असतो.

जेंव्हा तुम्हाला पैशाची गरज असते:
पॉलिसी, योग्य विमा योजना किंवा वेगवेगळ्या योजनांचे एक संयोजन असते, जे वेळोवेळी उद्भवणा-या विशिष्ट आर्थिक गरजा भागवण्यासाठी वापरता येते.
मुलांचे शिक्षण, आयुष्याची सुरवात किंवा विवाहाची तरतूद किंवा अडचणीच्या काळातील पैशाच्या नियमीत गरजा या पॉलिसींच्या मदतीने कमी तणावाच्या होऊ शकतात.
वैकल्पिकरित्या, पॉलिसीचे उपलब्ध होणारे पैसे एखाद्याच्या सेवेतील निवृत्तीच्या आणि घराची खरेदी किंवा इतर गुंतवणूकीसारख्या एखाद्या विशिष्ट हेतूने वापरता येतात. पॉलिसीधारकाला घर बांधणीसाठी किंवा सदनिका विकत घेण्यासाठी (काही विशिष्ट अटींच्या अधीन राहून) कर्ज मंजूर केले जाते.

पॉलिसी कोण विकत घेऊ शकतो?

कोणतीही व्यक्ती जी सज्ञान आहे आणि एखादा करार करण्यास पात्र आहे तो/ती स्वत:ला संरक्षीत करू शकते आणि ते ज्यांना त्याच्या/तीच्या मध्ये विमायोग्य हितसंबंध आहे.

काही अटींच्या अधीन राहून पॉलिसी एखाद्याच्या जोडीदाराच्या किंवा मुलांच्या आयुष्यावर सुद्धा घेता येतात. प्रस्ताव विम्यासाठी स्विकारताना, महामंडळाकडून कांही घटक जसे पॉलिसीधारकाच्या आरोग्याची स्थिती, प्रस्तावकर्त्याचे उत्पन्न आणि इतर तत्सम घटक विचारात घेतले जातात.

स्त्रीयांसाठी विमा

राष्ट्रीयकरणापूर्वी (१९५६) विमा, अनेक खाजगी विमा कंपन्यांनी स्त्रीयांच्या जीवनावरील विमा थोडा अधिक विम्याचा हप्ता घेऊन किंवा बंधनकारक अटींवर देऊ केला होता. तथापी, आयुर्विम्याच्या राष्ट्रीयकरणानंतर, स्त्रीयांच्या विम्याबाबतीत अटींचे पुनरावलोकन करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत, काम करणा-या आणि अर्थार्जन करणा-या महिलांना पुरूषांच्या बरोबरीने वागविण्यात येते. दुस-या बाबतीत, एक बंधनकारक कलम लावले जाते, जर स्त्रीचे वय फक्त ३० वर्षांपर्यंत असेल आणि जर तीचे करपात्र उत्पन्न नसेल तर.

वैद्यकीय असलेल्या आणि वैद्यकीय नसलेल्या आयुर्विमा योजना:

ज्याच्या आयुष्याचा विमा करावयाचा असेल त्याच्या वैद्यकीय तपासणी पश्चात तो करण्यात येतो. तथापी विम्याच्या व्यापक प्रसाराच्या सोईसाठी आणि गैरसोय टाळण्यासाठी, काही विशिष्ट अटींच्या अधीन राहून एलआयसी कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय विमा संरक्षण देत आली आहे.

लाभासहित आणि लाभाच्याशिवाय योजना
 

एखादी विमा पॉलिसी लाभाच्या ’सहित’ किंवा ’शिवाय’ असू शकते. याआधी, बोनस जाहिर केले जात, जर कोणता, नियमीत कालबद्ध मुल्यांकनानंतर पॉलिसीला वाटण्यात आला असल्यास आणि कराराच्या रकमेसोबत देय असल्यास.

लाभा ’शिवाय’ योजनांच्या बाबतीत, कराराची रक्कम कोणत्याही वाढीशिवाय दिली जाते. म्हणून लाभ ’सहित’ योजनांचे लावण्यात येणारे दर लाभा ’शिवाय’ योजनांपेक्षा जास्त असतात.

महत्वाच्या व्यक्तीचा विमा:

महत्वाच्या व्यक्तिचा विमा एखाद्या व्यवसायाकडून त्यांच्या महत्वाच्या कर्मचा-याच्या आयुष्यावर (एक/अनेक) फर्मचे आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी काढला जातो, जे महत्वाच्या व्यक्तिच्या अकाली मृत्युने होऊ शकते.

Top