Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » योजना » विमा योजना » जीवन रक्षक » पात्रता अटी आणि इतर बंधने
पात्रता अटी आणि इतर बंधने

पात्रता अटी आणि ईतर बंधने:


पात्रता अटी आणि ईतर बंधने
मूळ योजनेसाठी
(ही योजना कोणत्याही वैद्यकीय तपासणी व्यतिरिक्त फक्त प्रमाणीत सुदृढ जीवनासाठी लागू आहे)
 

 
किमान बेसिक सम एशुअर्ड प्रति जीवनासाठी * : रू. ७५,०००
कमाल बेसिक सम एशुअर्ड प्रति जीवनासाठी *
(बेसिक सम एशुअर्ड रू. ५०००/- च्या पटीत)
: रू. २,००,०००/-
प्रवेशाच्यावेळी किमान वय : ८ वर्षे (पूर्ण)
प्रवेशाच्यावेळी कमाल वय : ५५ वर्षे (सर्वात जवळचा वाढदिवस)
पॉलिसीची किमान मुदत : १० वर्षे
पॉलिसीची कमाल मुदत : २० वर्षे
परिपक्वतेच्यावेळी कमाल वय : ७० वर्षे (सर्वात जवळचा वाढदिवस)


*या योजनेंतर्गत जारी करण्यात आलेल्या सर्व पॉलिसींची एकूण बेसिक सम एशुअर्ड रू. २ लाखांपेक्षा जास्त असणार नाही.

एलआयसीच्या ऍक्सिडेंट बेनिफीट रायडरसाठी

  1. ऍक्सिडेंट बेनिफीट रायडरची किमान सम एशुअर्ड: रू. ७५,०००
  2. ऍक्सिडेंट बेनिफीट रायडरची किमान सम एशुअर्ड: भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून घेण्यात आलेल्या वैय्यक्तिक तसेच गट योजनांच्या अंगभूत एक्सिडेंट बेनिफीटसह आणि प्रस्तावित नविन प्रस्तावाची एक्सिडेंट बेनिफीट बेसिक सम एशुअर्ड लक्षात घेऊन कमाल ५० लाखांच्या मर्यादा अटीच्या अधिन राहून मूळ योजनेखालील बेसिक सम एशुअर्डच्या एवढी.


एक्सिडेंट बेनिफीट बेसिक सम एशुअर्ड रू. ५०००/- च्या पटीत असेल.

 
  1. प्रवेशाच्यावेळी किमान वय: १८ वर्षे (पूर्ण)
  2. प्रवेशाच्यावेळी कमाल वय: पॉलिसीच्या मुदतीत कोणत्याही पॉलिसीच्या वर्धापनदिनी संरक्षण निवडता येईल.
  3. संरक्षण समाप्तीचे कमाल वय: मूळ योजनेंतर्गत असलेल्याप्रमाणे.विम्याच्या हप्त्यांचा भरणा:

विमा हप्ते नियमीतपणे वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा मासिक (फक्त ’ईसीएस’ माध्यमातून) किंवा पॉलिसीच्या मुदतभर पगारकपात माध्यमातून भरता येतील.

तथापी, एक महिन्याची पण ३० दिवसांपेक्षा कमी नसलेली वाढीव मुदत वार्षिक, सहामाही आणि तिमाही विमाहप्त्यांच्या भरण्यासाठी आणि मासिक विमा हप्त्यांसाठी १५ दिवसांच्या वाढीव मुदत असेल.

विमाहप्त्यांचे नमुनादर
विमाहप्त्यांचे काही तक्त्याचे वार्षिक नमुनादर पुढीलप्रमाणे (सेवाकर वगळता) प्रति रू.१०००/- स.ए.: 
 

वय / मुदत

10

15

20

10

85.90

51.70

35.20

20

86.25

52.05

35.55

30

86.45

52.35

35.95

40

87.35

53.70

37.80

50

90.65

57.80

42.


पद्धत आणि उच्च स.ए. सूट:

पद्धत सूट:
वार्षिक पद्धत – तक्त्याच्या विमाहप्त्याच्या २%
सहामाही पद्धत -- तक्त्याच्या विमाहप्त्याच्या १%
त्रैमासिक, मासिक (इसीएस) आणि वेतनातून वजाव – काही नाही.


उच्च बेसिक सम एशुअर्ड सूट:
बेसीक सम एशुअर्ड - सूट (रू.)

७५,००० ते १,४५,००० काही नाही
१,५०,००० आणि त्यापुढे स.ए. च्या १.५०%

 

1.पुनरूज्जीवन:

जर विम्याचे हप्ते वाढीव मुदतेीत भरले नाहीत तर पॉलिसी समाप्त होईल. समाप्त झालेली एक पॉलिसी पहिल्या न भरलेल्या विमा हप्त्याच्या तारखेपासून पुढील सलग २ वर्षाच्या मुदतीत महामंडळाने भरण्याच्यावेळी निश्चित केलेल्या व्याजदराने व्याजासकट (सहामाही चक्रवाढ पद्धतीने) सर्व बाकी विमा हप्ते भरून, विमा पुढे चालू ठेवण्याच्या योग्यतेचा समाधानकारक पुरावा सादर करण्याच्या अधिन राहून पुनरूज्जीवित करता येईल.


जर निवडलेला असेल तर एक्सिडेंट बेनिफीट रायडरचे, पुनरूज्जीवन मूळ पॉलिसीच्या बरोबरच पुनरूज्जीवित करण्यात येईल आणि वेगळेपणाने नाही.
 

 

2. पेड-अप व्हॅल्यु:

जर किमान तीन पूर्ण वर्षांचे विम्याचे हप्ते भरण्यात आलेले असतील आणि जर पुढील कोणतेही विम्याचे हप्ते योग्यरित्या भरण्यात आलेले नसतील, तर ही पॉलिसी पूर्णपणे रद्द होणार नाही,तर एक पेड-अप पॉलिसी म्हणून चालू राहील. पॉलिसींतर्गत बेसिक सम एशुअर्ड अशा एका रकमेपर्यंत पेड-अप सम एश्युअर्ड या नावाने घटविण्यात येऊन, प्रत्यक्षात भरण्यात आलेले विम्याचे हप्ते पॉलिसींतर्गत मूळातच विहीत केलेल्या एकूण विमाहप्त्यांना सोसत असल्याने संपूर्ण बेसिक सम एशुअर्डशी तेच प्रमाण राखत असेल उदा. बेसिक सम एशुअर्ड * (भरण्यात आलेल्या विम्याच्या ह्प्त्यांची संख्या / देय विमा हप्त्यांची संख्या)


ही पेड-अप सम एशुअर्ड पॉलिसीच्या मुदतीच्या समाप्तेच्यावेळी किंवा विमाधारकाच्या अकाली मृत्युच्यावेळी देय असेल.


पॉलिसी बंद पडलेली असण्याच्या परिस्थितीत एक्सिडेंट बेनिफीट रायडरला कोणतीही पेड-अप व्हॅल्यु प्राप्त होत नाही आणि रायडरचे फायदे लागू होणे बंद होते.

 

3. सरेंडर व्हॅल्यु:

जर किमान तीन पूर्ण वर्षांचे विम्याचे हप्ते भरण्यात आलेले असतील तर रोख रकमेसाठी पॉलिसी समर्पीत करता येईल. गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यु ही एकूण भरण्यात आलेले विम्याचे हप्ते (सेवाकर वगळून), जे निवडलेले असतील ते अतिरिक्त विम्याचे हप्ते आणि रायडरच्या विम्याचे हप्ते सोडून टक्केवारीतील एक प्रमाण असेल.ही टक्केवारी पॉलिसी ज्यावर्षी समर्पीत करण्यात आली आणि पुढील निर्दिष्ट यांच्यावर अवलंबून असेल:
 

तथापी, महामंडळ स्पेशल सरेंडर व्हॅल्यु देऊ शकते, जर असे करणे पॉलिसीधारकाच्या अधिक हिताचे असेल.
 

4.पॉलिसी कर्ज:

जर पॉलिसीला सरेंडर व्हॅल्यु प्राप्त झालेले असेल आणि वेळोवेळी ज्या महामंडळ निर्दीष्ट करू शकते अशा शर्ती आणि अटींच्या अधिन राहून पॉलिसींतर्गत कर्ज घेता येऊ शकते.


5. कर :
जे असतील ते सेवाकरासहीत कर, कर कायदा आणि करांचे दर वेळोवेळी जे असतील ते, लागू होतील.

पॉलिसीधारकाला ज्या असतील त्या जास्तीच्या विम्याच्या हप्त्यासह विम्याच्या ह्प्त्यावरील प्रचलित दरानुसार असलेले कर देय असतील. या योजनेखाली फायद्यांची आकडेमोड करताना करापोटी भरण्यात आलेली रक्कम विचारात घेतली जाणार नाही.


6. कुलींग-ऑफ पिरीयड :
जर पॉलिसीधारक पॉलिसीच्या “शर्ती आणि अटीं” बाबत असमाधानी असेल तर, पॉलिसी महामंडळाला पॉलिसी करार मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात आक्षेपाचे कारण दाखवून परत करता येऊ शकेल. ती मिळाल्यावर महामंडळ पॉलिसी रद्द करेल आणि भरण्यात आलेल्या विम्याची रक्कम संरक्षणाखालील काळाचा प्रमाणबद्ध विमाहप्ता ( मूळ योजना आणि जो असेल तो एक्सिडेंट बेनिफीट रायडरसाठी ) आणि मुद्रांक शुल्क खर्च वजा जाता परत करेल.


7. अपवर्जन:

आत्महत्या: ही पॉलिसी निरर्थक होईल.

>>जर पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल, तर ज्याच्या आयुष्याचा विमा करण्यात आला (संतुलित असो किंवा वेडा) त्याने जर जोखीम सुरू झाल्याच्या तारखेपासून १२ महिन्यांमध्ये कधीही आत्महत्या केली, तर कोणतेही कर आणि जे असतील ते अतिरिक्त विम्याचे हप्ते आणि ज्या असेल त्या एक्सिडेंट बेनिफीट रायडरचे विम्याचे हप्ते वगळता एकूण भरण्यात आलेल्या विमाह्प्त्यांच्या ८०% च्या व्यतिरिक्त महामंडळ या पॉलिसीखालील इतर कोणत्याही क्लेमची दखल घेणार नाही


ज्याच्या आयुष्याचा विमा करण्यात आला (संतुलित असो किंवा वेडा) त्याने जर पुनरूज्जीवनाच्या तारखेपासून १२ महिन्यांमध्ये कधीही आत्महत्या केली, तर कोणतेही कर आणि जे असतील ते अतिरिक्त विम्याचे हप्ते आणि ज्या असतील त्या रायडरचे विम्याचे हप्ते वगळता मृत्युच्या तारखेपर्यंत भरण्यात आलेल्या एकूण विमाह्प्त्यांच्या जास्ती-जास्त ८०% किंवा सरेंडर व्हॅल्यु देय होईल या व्यतिरिक्त महामंडळ या पॉलिसीखालील
तर कोणत्याही क्लेमची दखल घेणार नाही.