मुख पृष्ठ » योजना » विमा योजना » न्यु मनिबॅक योजना – २० वर्षांची
न्यु मनिबॅक योजना – २० वर्षांची

फायदे

 पॉलिसी दस्तऎवज(१.१ एमबी )

'एलआयसी’ ची न्यु मनिबॅक योजना- २० वर्षांची ही एक सहभागी होण्याची नॉन-लिंक्ड योजना आहे, जी पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीमध्ये मृत्युपासूनचे संरक्षण, सोबत सजीवित असता कालावधीच्या दरम्यान निर्दिष्ट अंतराने नियमीत देयकांच्या आकर्षक संयोजनाचा प्रस्ताव सादर करते. हे बेजोड संयोजन पॉलिसीच्या परिपक्वतेच्या आधी कधीही विमा धारकाच्या दुर्दैवी मृत्युच्या परिस्थितीत कुटुंबाला अर्थिक सहाय्य पुरवते आणि पॉलिसीच्या मुदत समाप्तीच्यावेळी सजीवित पॉलिसीधारकाला रक्कम एकरकमी देते. ही योजना कर्जाच्या सोईच्या माध्यमातून त्याच्या तरलतेच्या गरजांची सुद्धा काळजी घेते.

1.फायदे:

डेथ बेनिफिट: जर पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल,तर “सम एशुअर्ड ऑन डेथ” परिभाषित डेथ बिनिफिट, जो असेल तो बहाल केलेला सोपा प्रतिवर्ती बोनस आणि अंतीम अतिरिक्त बोनस ती देय होईल. जेथे परिभाषित “सम एशुअर्ड ऑन डेथ” मुळ सम एशुअर्डच्या १२५% पेक्षा जास्त किंवा एकूण वार्षिक विमा हप्त्य्याच्या १० पट असेल. हा डेथ बेनिफिट मृत्युच्या तारखेपर्यंत एकूण भरण्यात आलेल्या विमा हप्त्याच्या १०५% च्या पेक्षा कमी असणार नाही.

वरील उल्लेखित विमा हप्ते हे सेवा कर, असल्यास अतिरिक्त विमा हप्ता आणि रायडर हप्ता वगळून.

सजीविततेचा फायदा: निर्दिष्ट कालावधीच्या शेवटी विमाधारक सजीवित असताना बेसिक सम एशुअर्डच्या २०% रक्कम प्रत्येक ५ व्या, १० व्या आणि १५ व्या पॉलिसीवर्षाच्या शेवटी.

परिपक्वतेचा फायदा: निर्दिष्ट परिपक्वतेच्या तारखेला विमाधारक सजीवित असताना बेसिक सम एशुअर्डच्या ४०%, सोबत जो असेल तो बहाल केलेला सोपा प्रत्यावर्ती बोनस आणि अंतीम अतिरिक्त बोनस देय होईल.

नफ्यामध्ये सहभाग: जर पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल तर, पॉलिसी महामंडळाच्या नफ्यामध्ये सहभागी होईल आणि महामंडळाच्या अनुभवाप्रमाणे जाहीर होणारे सोपे प्रत्यावर्ती बोनस प्राप्त करण्यास पात्र होईल.

जर पॉलिसी काही निश्चित कालावधीसाठी चालू राहिली असेल, तर ज्या वर्षी पॉलिसी क्लेममध्ये मृत्यु किंवा परिपक्वतेमुळे परिणामी होते तेंव्हा पॉलिसीअंतर्गत अंतीम (अतिरिक्त) बोनस सुद्धा जाहिर करण्यात येईल.

2.ऎच्छिक फायदे:

’एलआयसी’ चा डेथ एण्ड डिसऍबिलिटी बेनिफिट रायडर: ’एलआयसी’ चा डेथ एण्ड डिसऍबिलिटी बेनिफिट रायडर हा एक पॉलिसीच्या मुदतीत जास्तीचा विमा हप्त्यासाठी पैसे भरून हा रायडर एक ऐच्छिक पर्याय म्हणून उपलब्ध आहे आणि जर पूर्ण सम एशुअर्डसाठी अपघाताच्या दिवशी पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल, तर सुरक्षाछत्र पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीमध्ये उपलब्ध असेल. पॉलिसीच्या मुदतीत अपघाती मृत्युच्या बाबतीत मुळ योजनेखाली एक रकमी एक्सिडेंट बेसिक सम एशुअर्ड सुद्धा डेथ बेनिफिट बरोबर देय होईल. अपघातामुळे येणा-या कायमस्वरूपी अपघाती अपंगत्वाच्या बाबतीत (अपघाताच्या तारखेपासून १८० दिवसांमध्ये) एक्सिडेंट बेनिफिट सम एशुअर्डच्या रकमेच्या एवढी रक्कम पुढील १० वर्षे समान मासिक हप्त्यांमध्ये देण्यात येईल आणि भविष्यकालीन एक्सिडेंट बेनिफिट सम एश्युअर्डचे विमा हप्ते, तसेच बेसिक सम एशुअर्डचे विम्याच्या भागाचे हप्ते, जे या पॉलिसीखाली एक्सिडेंट बेनिफिट सम एश्युअर्डच्या एवदे आहेत ते माफ करण्यात येतील.

तथापी, चालू स्थितीतील मूळ पॉलिसी समर्पित केली असता (जीला सरेंडर मुल्य प्राप्त झालेले आहे) तीला जो रायडर जोडलेला आहे त्याच्या संरक्षणछत्राच्या प्रमाणात आकारण्यात आलेला अतिरिक्त विमाहप्ता, विमाहप्ता भरण्याच्या कालावधी पश्चात परत करण्यात येईल.

Top