Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » योजना » विमा योजना » न्यु मनिबॅक योजना – २० वर्षांची » पात्रता अटी आणि इतर बंधने
पात्रता अटी आणि इतर बंधने:

पात्रता अटी आणि इतर बंधने:

मूळ योजनेसाठी

1.किमान बेसिक सम एशुअर्ड : रू.१,००,०००
2.कमाल बेसिक सम एश्युअर्ड
(बेसिक सम एशुअर्ड रू. ५,०००/- च्या पटीत असेल)
: कोणतीही मर्यादा नाही
3.विमाधारकासाठी आरंभाच्यावेळी किमान वय : १३ वर्षे (पूर्ण)
4.विमाधारकासाठी आरंभाच्यावेळी कमाल वय: : ५० वर्षे (सर्वात जवळचा वाढदिवस)
5.विमाधारकासाठी कमाल परिपक्वता वय :७० वर्षे (सर्वात जवळचा वाढदिवस)
6.मुदत  : २० वर्षे
7.विमा हप्ते भरण्याची मुदत(पीपीटी) : १५ वर्षे

’एलआयसी’ अपघाती मृत्यु आणि अपंगत्व फायद्याचा रायडरच्यासाठी

किमान अपघाती फायद्याची सम एशुअर्ड : रू. १००,०००
कमाल अपघाती फायद्याची सम एशुअर्ड
(
अपघाती बेनिफिट रक्कम
 रुपये च्या पटीत 
असेल अॅश्युअर्ड . 5000 / -
)
: मूळ योजनेखालील बेसिक सम एशुअर्डच्या एवढी, जास्ती-जास्त ५० लाखाच्या अधीन.अपघाताच्या फायद्याची सम एशुअर्ड ही भारतीय विमा महामंडळाकडून घेतलेल्या सर्व अंतर्भूत अपघाती फायद्यासह आणि नविन प्रस्तावातील अपघाती बेसिक सम एशुअर्ड वैयक्तिक, तसेच गट-समुहातील विचारात घेता.
विमाधारकाचे आरंभाच्यावेळी किमान वय : १८ वर्षे (पूर्ण)
विमाधारकाचे आरंभाच्यावेळी कमाल वय : विमाहप्त्याच्या मुदतीत संरक्षणछत्र कोणत्याही पॉलिसीच्या वर्धापनदिनाच्या वेळी निवडता येईल.  
संरक्षणछत्र समाप्ती वय  : ७० वर्षे (सर्वात जवळचा वाढदिवस)


विमाह्प्त्यांचा भरणा:
विमाह्प्ते भरण्याच्या मुदतीत विमा हप्ते नियमीतपणे वार्षिक, सहामाही, तिमाही किंवा मासिक अंतराने भरता येतील (फक्त ’ईसीएस’ माध्यमातून) किंवा पॉलिसीच्य मुदतभर पगारकपात माध्यमातून.तथापि वार्षिक, सहामाही आणि तिमाही विमा हप्त्यांच्या भरण्यासाठी एक महिन्याचा पण ३० दिवसांपेक्षा कमी नसलेला आणि मासिक विमा हप्त्यांसाठी १५ दिवसांच्या अतिरिक्त कालावधीची परवानगी असेल.

विमा हप्त्याचे नमुनादर:
खालील विम्याच्या हप्त्याच्या तक्त्याचे काही नमुना दर (रुपयामध्ये) (सेवाकर वगळता) प्रति रू. १०००/- बेसिक सम एशुअर्डसाठी
 

वय (वर्षामध्ये)

विमाहप्ता (रूपयात)

२० 

७८.०० 

३०   

७९.१० 

४० 

८२.९५

५०

९२.०५

पद्धत आणि उच्च विमा राशीवर सुट:

पद्धत सवलत:
वार्षिक पद्धत – तक्त्याच्या विमा ह्प्त्यावर २%
सहामाही पद्धत - तक्त्याच्या विमा ह्प्त्यावर १%
तिमाही व पगार कपात पद्धत – काही नाही.

उच्च विमा राशी सुट
बेसिक सम एश्युअर्ड (बी.एस.ए)- सुट (रू.)

१,००,००० ते १,९५,०००- नाही
२,००,००० ते ४,९५,००० – बेसिक सम एशुअर्ड वर २%
५,००,००० वर आणि त्यापेक्षा अधिक - बेसिक सम एशुअर्ड वर ३.००%

1.पुनरूज्जीवन:

जर प्रिमियम वाढीव कालावधीमध्ये भरले नाहीत तर पॉलिसी समाप्त होईल. समाप्त झालेली एक पॉलिसी पहिल्या न भरलेल्या विमा हप्त्याच्या तारखेपासून परंतू परिपक्वतेच्या तारखेच्या आधी पुढील २ वर्षात महामंडळाने वेळोवेळी निश्चित केलेल्या व्याजदराने व्याजासकट (सहामाही चक्रवाढ पद्धतीने) सर्व बाकी विमा हप्ते भरून, विमा पुढे चालू ठेवण्याच्या योग्यतेचा समाधानकारक पुरावा सादर करण्याच्या अधिन राहून पुनरूज्जीवित करता येईल

महामंडळ मूळ शर्तींवर स्विकारण्याचा,सुधारित शर्तींवर स्विकारण्याचा किंवा खंडीत झालेली पॉलिसीचे पुनरूज्जीवन न करण्याचा हक्क राखून ठेवते. खंडीत पॉलिसीचे पुनरूज्जीवन महामंडळाने परवानगी दिल्या नंतरच प्रत्यक्षात येते आणि विमा धारकाला महामंडळा कडून तसे स्पष्टपणे कळविण्यात येते.
रायडर (एक/अनेक) जर निवडलेला असेल तर त्याचे मूळ पॉलिसी बरोबरच पुनरूज्जीवन होईल, वेगळेपणाने नाही.
 

  1. पेड-अप मूल्य:

जर किमान तीन पूर्ण वर्षांचे विम्याचे हप्ते भरण्यात आलेले असतील आणि त्यानंतरचे कोणतेही हप्ते योग्य पद्धतीने भरलेले नसतील तर ही पॉलिसी पूर्णत: रद्द होणार नाही, तर एक पेड-अप पॉलिसी म्हणून चालू राहील. या पॉलिसी अंतर्गत बेसिक सम एशुअर्ड अशा एका रकमेपर्यंत घटविण्यात येईल जीला “पेड-अप सम एशुअर्ड” म्हणतात आणि जी [(भरण्यात आलेल्या विमाहप्त्यांची संख्या / एकूण देय विमाह्प्त्यांची संख्या) गुणीले बेसिक सम एशुअर्ड ] वजा एकूण सजीविततेची आत्तापर्यंत देण्यात आलेली रक्कम याच्या समतुल्य असेल
अशाप्रकारे कमी करण्यात आलेली पॉलिसी येथूनपुढे विम्याचे हप्ते भरण्याच्या जबाबरीतून मुक्त असेल, परंतू भविष्यातील फायदे मिळविण्यात सहभागी होण्यासाठी पात्र असणार नाही. तथापि बहाल करण्यात आलेले सोपे प्रत्यावर्ती बोनस कमी करण्यात आलेल्या पेड-अप पॉलिसीला जोडलेलेच असतील.

असे असले तरी, कमी करण्यात आलेल्या पेड-अप पॉलिसीच्या बाबतीत पूर्ण प्रभावी असलेल्या पॉलिसीखालील उपलब्ध असलेले फायदे देय होतील, सजीविततेचे फायदे मिळणार नाहीत आणि पेड-अप व्हॅल्यु सोबत जे असतील ते, बहाल करण्यात आलेले सोपे प्रत्यावर्ती बोनस पॉलिसीच्या मुदतीअंती किंवा विमाधारकाच्या मृत्युपश्चात, यापैकी जे आधी असेल ते, फक्त एकरकमी देय होतील.

रायडर (एक/अनेक) ला कोणतेही पेड-अप मुल्य प्राप्त होणार नाही आणि पॉलिसी बंद पडण्याच्या परिस्थितीत रायडरचे फायदे लागू होणे बंद होते

3. सरेंडर व्हॅल्यु :
जर किमान तीन पूर्ण वर्षांचे विम्याचे हप्ते भरण्यात आलेले असतील तर रोख रकमेसाठी पॉलिसी समर्पीत करता येईल. गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यु एकूण भरण्यात आलेले विम्याचे हप्ते (सेवाकर वगळून), जे निवडलेले असतील ते अतिरिक्त विम्याचे हप्ते आणि रायडरच्या विम्याचे हप्ते सोडून वजा आत्तापर्यंत देण्यात आलेले कोणतेही सजीविततेचे फायदे यांचे टक्केवारीतील प्रमाण असेल.ही टक्केवारी पॉलिसी ज्यावर्षी समर्पीत करण्यात आली आणि पुढील निर्दिष्ट यांच्यावर अवलंबून असेल:

पॉलिसी वर्ष  

१    

२  

३   

४ 

६    

७ 

९ 

१०

एकूण भरण्यातआलेल्याविम्याच्या
हप्त्यांना लागू असलेले %
 

०.०० 

०.०० 

३०.००

५०.००  

५०.०० 

५०.०० 

५०.०० 

५२.५०

५५.०० 

५७.५० 

पॉलिसी वर्ष

११

१२

१३

१४

१५

१६

१७.

१८ 

१९

२०

एकूण भरण्यातआलेल्याविम्याच्या
हप्त्यांना लागू असलेले %

६०.००

६२.५०  

६५.००

६७.५०

७०.००

७२.५० 

७५.००

७७.५० 

८०.००


८०.००

याशिवाय ज्या असेल त्या सोप्या प्रत्यावर्ती बोनसची सरेंडर व्हॅल्यु सुद्धा देय होईल. जी सोपा प्रत्यावर्ती बोनस गुणीले बहाल केलेल्या बोनसला लागू असलेला सरेंडर व्हॅल्यु गुणक याच्या समतुल्य असेल. हे गुणक पॉलिसी ज्यावर्षी समर्पीत करण्यात आली आणि पुढील निर्दिष्ट यांच्यावर अवलंबून असेल:

पॉलिसी वर्ष  

१    

२  

३   

४ 

६    

७ 

९ 

१०

बहाल करण्यात
आलेल्या बोनसना 
लागू असलेले %

०.०० 

०.०० 

१६.२२

१६.५८

१७.०३

१७.५८ 

१७.५८

१७.६६

१७.८५

१८.१६  

पॉलिसी वर्ष

११

१२

१३

१४

१५

१६

१७.

१८

१९

२०

बहाल करण्यात
आलेल्या बोनसना 
लागू असलेले %

१८.६० 

१९.१८ 

१९.९३  

२०.८५ 

२१.९९ 

२३.३८  

२५.०५ 

२७.०६ 

३०.००  

३५.००

तथापि महामंडळ स्पेशल सरेंडर व्हॅल्यु देऊ शकते, जर असे करणे पॉलिसीधारकाच्या अधीक हिताचे असेल. 
 

1.पॉलिसी कर्ज:
पॉलिसीअंतर्गत कर्ज उपलब्ध होऊ शकते जर, पॉलिसीला सरेंडर व्हॅल्यु प्राप्त झाले असेल आणि शर्ती व अटी ज्या कंपनीकडून वेळोवेळी निर्देशित केल्या जाऊ शकतात त्याप्रमाणे.

2.कर:
जे असतील ते सेवाकरासहीत कर, कर कायदा आणि करांचे दर वेळेवेळी जे असतील ते, लागू होतील.
पॉलिसी धारकाला ज्या असतील त्या जास्तीच्या विम्याच्या हप्त्यासह विम्याच्या ह्प्त्यावरील प्रचलित दरानुसार असलेले कर देय असतील. या योजनेखाली फायद्यांची आकडेमोड करताना करापोटी भरण्यात आलेली रक्कम विचारात घेतली जाणार नाही.

3.कूलिंग-ऑफ पिरीयड:
जर पॉलिसी धारक पॉलिसीच्या “शर्ती आणि अटीं” बाबत असमाधानी असेल तर पॉलिसी महामंडळाला पॉलिसी मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात आक्षेपाचे कारण दाखवून परत करता येईल. ती मिळाल्यावर महामंडळ पॉलिसी रद्द करेल आणि भरण्यात आलेला भरणा करण्यात आलेल्या विमाह्प्त्यांची रक्कम संरक्षणाखालील काळाचा प्रमाणबद्ध विमा हप्ता [(मूळ योजनेसाठी आणि जे असतील ते रायडर (एक/अनेक) ], जो असेल तो वैद्यकीय परिक्षण, अहवाल, विशेष अहवाल आणि मुद्रांक शुल्क यांचा खर्च, वजा जाता परत करेल.

4.अपवर्जन:
आत्महत्येचे कलम:- ही पॉलिसी निर्थेक होईल,

» जर पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल, तर ज्याच्या आयुष्याचा विमा करण्यात आला (संतुलित असो किंवा वेडा) त्याने जर जोखीम सुरू झाल्याच्या तारखेपासून १२ महिन्यांमध्ये कधीही आत्महत्या केली, तर कोणतेही कर आणि जे असतील ते अतिरिक्त विम्याचे हप्ते वगळता एकूण भरण्यात आलेल्या विमाह्प्त्यांच्या ८०% पर्यंतच्या रकमे व्यतिरिक्त महामंडळ या पॉलिसीखालील कोणत्याही क्लेमची दखल घेणार नाही

» ज्याच्या आयुष्याचा विमा करण्यात आला (संतुलित असो किंवा वेडा) त्याने जर पुनरूज्जीवनाच्या तारखेपासून १२ महिन्यांमध्ये आत्महत्या केली तर, जर पॉलिसी पूर्ण प्रभावी असेल तर (कोणतेही कर आणि जे असतील ते अतिरिक्त विम्याचे हप्ते वगळता) एक रक्कम जी मृत्युच्या तारखेपर्यंत भरण्यात आलेल्या एकूण विमाह्प्त्यांच्या ८०% पेक्षा जास्त असेल किंवा सरेंडर व्हॅल्यु देय होईल या व्यतिरिक्त महामंडळ या पॉलिसीखालील ईतर कोणत्याही क्लेमची दखल घेणार नाही.

Top