Javascript is not currently enabled in your browser.
You must enable Javascript to run this web page correctly.

मुख पृष्ठ » योजना » विमा योजना » जीवन लाभ » पात्रता अटी आणि ईतर बंधने
पात्रता अटी आणि ईतर बंधने

1. पात्रता अटी आणि ईतर बंधने :

a)     किमान बेसिक सम एशुअर्ड:रू.२,००,०००
b)     कमाल बेसिक सम एशुअर्ड:मर्यादा नाही
(बेसिक सम एशुअर्ड रू. १०,०००/- च्या पटीत असेल)
c)     पॉलिसीची मुदत / विमा हप्ता भरण्याची मुदत: (१६/१०), (२१/१५)(२५/१६) वर्षे
d)     प्रवेशाच्यावेळी किमान वय : [८] वर्षे (पूर्ण)
e)     प्रवेशाच्यावेळी कमाल वय:     [५९] वर्षे (जवळच्या वाढदिवशी) १६ वर्षाच्या पॉलिसी मुदतीसाठी
                                           [५४] वर्षे (जवळच्या वाढदिवशी) २१ वर्षाच्या पॉलिसी मुदतीसाठी आणि &
                                           [५०] वर्षे (जवळच्या वाढदिवशी) २५ वर्षाच्या पॉलिसी मुदतीसाठी

f)      कमाल परिपक्वता वय : [७५] वर्षे (जवळच्या वाढदिवशी)

 

2.    विम्याच्या ह्प्त्यांचा भरणा:

विमा हप्ता भरण्याच्या मुदती दरम्यान विम्याचे हप्ते नियमीतपणे वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक अंतराच्या पद्धतीने (फक्त ’ईसीएस,च्या माध्यमातून) किंवा ’एसएसएस’ च्या माध्यमातून भरता येतील.
 
तथापी, एक महिन्याचा अधिकचा कालावधी जो ३० दिवसांपेक्षा कमी नसेल, असा वार्षिक, सहामाही, त्रैमासिक पद्धतींसाठी आणि १५ दिवसांचा मासिक विमाहप्ता भरणा पद्धतीसाठी मंजूर केला जाईल.

 

3. नमुना विमाहप्ता दर:

खाली दिल्याप्रमाणे वार्षिक विमा तक्ता नमुना दर (रू. मध्ये) (सेवाकराशिवाय) प्रती रू.१०००/- बेसिक सम एशुअर्ड):

 
वय
(वर्षांमध्ये)
पॉलिसीची मुदत /विमा हप्ता भरण्याची मुदत (वर्षांमध्ये)
१६(१०) २१ (१५) २५(१६)
२० ८५.२० ५४.५० ४५.९५
३० ८५.५० ५४.९५ ४६.६०
४० ८६.८० ५६.८० ४८.९०
५० ९०.९५ ६१.८५ ५४.८०
 

4.    पद्धत आणि उच्च स.ए. सूट:

पद्धत सूट:

वार्षिक पद्धत तक्त्यामधील विमाहप्त्याच्या २%
सहामाही पद्धत तक्त्यामधील विमाहप्त्याच्या १%
त्रैमासिक, मासिक पद्धत आणि ’एसएसएस’ – काही नाही.
उच्च सम एशुअर्ड सूट:
बेसिक सम एशुअर्ड (बी.एस.ए.) सूट (रू.)
२,००००० ते ४,९०,००० काही नाही
५,००,००० ते ९,९०,००० ’बी.एस.ए.’ च्या १.२५%.
१०,००,००० ते १४,९०,००० ’बी.एस.ए.’ च्या १.५०%
१५,००,००० पासून पुढे ’बी.एस.ए.’ च्या १.७५%

5.    पुनरूज्जीवन::

जर प्रिमियम अतिरिक्त कालावधीमध्ये भरले नाहीत तर पॉलिसी समाप्त होईल. समाप्त झालेली एक पॉलिसी पहिल्या न भरलेल्या विमा हप्त्याच्या तारखेपासून पुढील २ वर्षात पण पॉलिसीच्या समाप्तीच्या आधी महामंडळाने वेळोवेळी निश्चित केलेल्या व्याजदराने व्याजासकट (सहामाही चक्रवाढ पद्धतीने) सर्व बाकी विमा हप्ते भरून, विमा पुढे चालू ठेवण्याच्या योग्यतेचा समाधानकारक पुरावा सादर करण्याच्या अधिन राहून पुनरूज्जीवित करता येईल .
 
महामंडळ मूळ शर्तींवर स्विकारण्याचा,सुधारित शर्तींवर स्विकारण्याचा किंवा खंडीत झालेली पॉलिसीचे पुनरूज्जीवन न करण्याचा हक्क राखून ठेवते. खंडीत पॉलिसीचे पुनरूज्जीवन महामंडळाने परवानगी दिल्या नंतरच प्रत्यक्षात येते आणि विमा धारकाला महामंडळा कडून तसे स्पष्टपणे कळविण्यात येते.
 
रायडर (एक/अनेक) जर निवडलेला असेल तर त्याचे मूळ पॉलिसी बरोबरच पुनरूज्जीवन होईल, वेगळेपणाने नाही.

 

6.   पेड-अप मूल्य:

जर किमान तीन पूर्ण वर्षांचे विम्याचे हप्ते भरण्यात आलेले असतील आणि त्यानंतरचे कोणतेही हप्ते योग्य पद्धतीने भरलेले नसतील तर ही पॉलिसी पूर्णत: रद्द होणार नाही, तर एक पेड-अप पॉलिसी म्हणून चालू राहील.
 
पेड-अप पॉलिसी अंतर्गत मृत्युपश्चात बेसिक सम एशुअर्ड अशा एका रकमेपर्यंत ’डेथ पेड-अप सम एश्युअर्ड’ या नावाने घटविण्यात येईल आणि ती [ मृत्युपश्चात बेसिक सम एश्युअर्ड * (भरण्यात आलेल्या विम्याच्या ह्प्त्यांचा आकडा / भरावयाच्या विम्याच्या हप्त्यांचा आकडा)] एवढी असेल
 
पेड-अप पॉलिसी अंतर्गत परिपक्वतेच्या वेळी बेसिक सम एशुअर्ड अशा एका रकमेपर्यंत ’परिपक्व पेड-अप सम एश्युअर्ड’ या नावाने घटविण्यात येईल आणि ती [ परिपक्व बेसिक सम एश्युअर्ड * (भरण्यात आलेल्या विम्याच्या ह्प्त्यांचा आकडा / भरावयाच्या विम्याच्या हप्त्यांचा आकडा)] एवढी असेल
 
 
जर एखादी पॉलिसी एक पेड-अप पॉलिसी म्हणून चालू राहीली , तर ती भविष्यातील नफ्यात सहभागी होण्यास पात्र होणार नाही. तथापी, बहाल करण्यात आलेला सोपा प्रत्यावर्ती बोनस,जे असतील ते, वजावट केलेल्या पेड-अप पॉलिसीला जोडलेले असतील
 
Rider(s) पॉलिसी बंद असल्याच्या परिस्थितीत, रायडर (एक/अनेक)ला कोणतेही पेड-अप मुल्य प्राप्त होत नाही, आणि रायडरचे फायदे लागू होणे समाप्त होते..
 

7.    सरेंडर व्हॅल्यु:

Tकिमान तीन पूर्ण वर्षाचे विम्याचे हप्ते भरण्यात आलेले असतील तर पॉलिसी रोकड रकमेसाठी समर्पित करता येऊ शकते. गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यु, एकूण भरण्यात आलेले विम्याच्या हप्त्याची टक्केवारी असेल. ही टक्केवारी अवलंबून असेल पॉलिसीची मुदत आणि पॉलिसीचे वर्ष जेंव्हा पॉलिसी समर्पित करण्यात आली आणि खाली निर्देशीत केल्या प्रमाणे.

 

 

उपरोक्त विम्याच्या हप्त्यांमध्ये कोणत्याही करांचा, विमा स्विकारण्याच्या निर्णयामूळे आकारण्यात आलेली जादाच्या रक्कमेचा आणि जे असतील त्या रायडर (एक/अनेक) च्या विमा हप्त्यांचा समावेश नाही.
 
याशिवाय, ज्या असेल त्या बहाल केलेल्या सोप्या प्रतिवर्ती बोनसची सरेंडर व्हॅल्यु, ती सुद्धा देय होईल, जी बहाल केलेले बोनस गुणीले बहाल केलेल्या बोनसला लागू सरेंडर व्हॅल्युचे प्रमाण याच्या येणा-या रकमे एवढी असेल. हे प्रमाण पॉलिसीची मुदत आणि त्या पॉलिसी वर्षावर अवलंबून असेल ज्या वर्षी पॉलिसी समर्पीत केली आहे आणि खालील प्रमाणे निर्देशीत केले आहे.
 


 

तथापि, महामंडळ स्पेशल सरेंडर व्हॅल्यु देऊ शकते, जर असे करणे पॉलिसीधारकाच्या अधिक हिताचे असेल.

 

8.    पॉलिसी कर्ज:

Loan can be availed under the policy provided the policy has acquired a surrender value and subject to the terms and conditions that the Corporation may specify from time to time.
 

9.    कर:

अश्या विमा योजनांवर बसवण्यात आलेले जे असतील ते वैधानिक कर जे भारत सरकार किंवा भारताच्या ईतर घटनात्मक अधिकारी मंडळी यांनी वेळेवेळी कर कायदे आणि लागू कर दरांप्रमाणे लागू होतील.
 
पॉलिसीच्या अंतर्गत देय विमा ह्प्त्यावरील प्रचलित दरांप्रमाणे देय होणारी सेवाकराची रक्कम देय होईल, जी पॉलिसी धारकाकडून देय असलेल्या विम्याच्या हप्त्यांच्या शिवाय स्वतंत्रपणे घेण्यात येतील. या योजनेखाली फायद्यांची आकडेमोड करताना करापोटी भरण्यात आलेली रक्कम विचारात घेतली जाणार नाही.

10.  फ्री-लूक पिरीयड::

जर पॉलिसीधारक पॉलिसीच्या “शर्ती आणि अटीं” बाबत असमाधानी असेल तर, पॉलिसी महामंडळाला पॉलिसी मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात आक्षेपाचे कारण दाखवून परत करता येईल. ती मिळाल्यावर महामंडळ पॉलिसी रद्द करेल आणि भरण्यात आलेल्या विम्याची रक्कम संरक्षणाखालील काळाचा प्रमाणबद्ध विमाहप्ता (( मूळ योजना आणि रायडर (एक/अनेक), जो असेल तो)) जो असेल तो वैद्यकीय परिक्षण अहवाल, विशेष अहवाल आणि मुद्रांक शुल्क यांचा खर्च, वजा जाता परत करेल..
 

11.  अपवर्जन:

आत्महत्या:- ही पॉलिसी निरर्थेक होईल

        i. जर ज्याच्या आयुष्याचा विमा करण्यात आला (संतुलित असो किंवा वेडा) त्याने जर जोखीम सुरू झाल्याच्या तारखेपासून १२ महिन्यांमध्ये कधीही आत्महत्या केली, जर पॉलिसी प्रभावी असेल, तर भरण्यात आलेल्या फार फार तर ८०% विमाहप्त्यां व्यतिरिक्त महामंडळ या पॉलिसीखालील कोणत्याही क्लेमची दखल घेणार नाही.

 

       ii. जर ज्याच्या आयुष्याचा विमा करण्यात आला (संतुलित असो किंवा वेडा) त्याच्या पुनरूज्जीवनाच्या तारखेपासून १२ महिन्यांमध्ये आत्महत्या करण्यावर, मृत्युच्या तारखेपर्यंत भरण्यात आलेल्या विमा हप्त्यांच्या ८०%पेक्षा जास्त रक्कम किंवा जर पॉलिसी प्रभावी असेल तर सरेंडर व्हॅल्यु देय होईल, या व्यतिरिक्त महामंडळ या पॉलिसीखालील कोणत्याही क्लेमची दखल घेणार नाही. हे कलम पेड-अप मूल्याशिवाय बंद पडलेल्या पॉलिसीला लागू होणार नाही आणि अशा पॉलिसी अंतर्गत कोणतीही रक्कम देय होणार नाही.

 

उपरोक्त विम्याच्या हप्त्यांमध्ये कोणत्याही करांचा, विमा स्विकारण्याच्या निर्णयामूळे आकारण्यात आलेल्या जादाच्या रक्कमेचा आणि टर्म एशुरन्स रायडर सोडून कोणत्याही रायडर (एक/अनेक) च्या विमा हप्त्यांचा समावेश नाही.  

फायद्यांचे स्पष्टीकरण:

 
वैधानिक चेतावणी:

"काही फायदे खात्रीशीर आणि काही तुमच्या विमा व्यवसाय करणा-याच्या भविष्यकाळातील कामगिरी वर मिळणा-या परताव्याच्या प्रमाणात बदलणारे असतात. जर आपली पॉलीसी खात्रीशीर परतावा देऊ करत असेल तर ते या पानावरील स्पष्टिकरण तालिकेमध्ये “खात्रीशीर” असा स्पष्टपणे उल्लेख केलेला असेल. जर आपली पॉलिसी बदलता परतावा देऊ करत असेल तर या पानावरील स्पष्टिकरण भविष्यकाळातील गृहित धरलेले गुंतवणीच्या परताव्याचे दोन वेगळ्या प्रकारचे दर दर्शवतील. हे गृहित धरलेले दर खात्रीशीर नसतात आणि ती आपल्याला परत मिळणा-या मुल्याची कमाल-किमान पातळीही नसते, कारण आपल्या पॉलिसीचे मुल्य भविष्यातील गुंतवणुकीच्या कामगिरीसह इतर अनेक घटकांवर अवलंबून असते."
 

 
 

 
 
टीप:

i)      वरील स्पष्टिकरणामध्ये बिनखात्रीशीर फायदे (१) आणि (२) हे गणन केलेले असल्यामुळे ते गुंतवणुकीच्या अंदाजी परताव्याच्या दराशी अनुक्रमे ४% द.सा. (परिस्थिती १) आणि ८% द.सा. (परिस्थिती २) शी सुसंगत आहेत. दुस-या शब्दात सांगावयाचे झाले तर, हे फायद्याचे स्पष्टिकरण बनवतानाच हे गृहित धरलेले असते की पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीमध्ये ’एलआयसी’ ला गुंतवणुकीचा अंदाजी परतावा दर परिस्थितीनुसार ४% प्रतिवार्षिक आणि ८% प्रतिवार्षिक असा मिळू शकेल. अंदाजी गुंतवणुक परतावादर खात्रीशीर नाहीत.

ii)      या स्पष्टिकरणाचा मुख्य हेतू हा की या प्रोडक्टसच्या वैशिष्ठांची आणि काही प्रमाणात आकडेवारी च्या सहाय्याने वेगवेगळ्या परिस्तितीत मिळणारा फायद्यांचा ओघ यांची प्रशंसा करण्यासाठी ग्राहक सक्षम असतो.

विमा कायदा, १९३८ चे कलम ४५:
 

वेळोवेळी सुधारणाकरण्यात आलेल्या विमा कायदा, १९३८ चे कलम ४५ च्या तरतूदी लागू होतील, या तरतुदींची सोपी करण्यात आलेली आवृत्ती पुढील प्रमाणे आहे:
 
सुधारित विमा कायदा (सुधारणा), २०१५ प्रमाणे विमा कायदा, १९३८ चे कलम ४५ च्या दृष्टीने पॉलिसीच्या बाबतीत हरकत न घेण्यात येणा-या तरतुदी पुढील प्रमाणे आहेत. :
 
1. जीवन विम्याच्या पॉलिसीवर पुढील पासून तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही आधारावर जे जे असेल त्या, हरकत घेता येणार नाही
a) पॉलिसीची निर्गमीत केल्याची तारीख किंवा
b) जोखीम सुरू झाल्याची तारीख किंवा
c) पॉलिसीच्या पुनरूज्जीवनाची तारीख किंवा
d) पॉलिसीच्या रायडरची तारीख
यापैकी जे उशीरा असेल ते.
 
2. फसवणूकीच्या आधारावर पुढील पासून तीन वर्षांच्या दरम्यान हरकत घेता येईल
a) पॉलिसीची निर्गमीत केल्याची तारीख किंवा
b) जोखीम सुरू झाल्याची तारीख किंवा
c) पॉलिसीच्या पुनरूज्जीवनाची तारीख किंवा
d) पॉलिसीच्या रायडरची तारीख
यापैकी जे उशीरा असेल ते.
 
यासाठी, विमाकर्त्याने विमाधारक किंवा विमाधारकाचा कायदेशीर प्रतिनिधी किंवा नामनिर्देशित व्यक्ती किंवा मुख्त्यार यांच्याशी आधार आणि वस्तूस्थिती ज्यावर असा निर्णय आधारित आहे त्याचा उल्लेख करून लेखी स्वरूपात कळवले पाहिजे.
 
3. फसवणूक याचा अर्थ विमाधारक, किंवा त्याचा प्रतिनिधी यांच्या कडून विमाकर्त्याला फसवण्याच्या हेतूने किंवा जीवन विम्याची पॉलिसी जारी करण्यासाठी विमाकर्त्याला प्रवृत्त करण्यासाठी करण्यात आलेले खालीलपैकी कोणतीही कृत्ये.
a. सूचना, वस्तूत: जी खरी नाही आणि जी खरी आहे याची विमाधारकाला खात्री नाही;
b) वस्तूस्थितीची माहिती आणि खात्री असताना विमाधारकाकडून वस्तूस्थिती सक्रियपणे दडवणे;
c) फसवणूकीला पूरक असे ईतर कोणतेही कृत्य; आणि
d) असे कोणतेही कृत्य किंवा वगळणे जे कायद्याने विशेषत: फसवणूक म्हणून जाहिर केले आहे.
 
4. फक्त गप्प बसणे ही फसवणूक नाही तोपर्यंत, प्रकरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असते की हे विमाधारक किंवा त्याच्या प्रतिनिधीचे कर्तव्य आहे की बोलण्यासाठी गप्प बसणे किंवा गप्प बसणे हेच बोलण्याच्या समतुल्य आहे.
 
5. जर विमाधारक / लाभार्थी जर हे सिद्ध करू शकत असेल की, चूकीचे विधान त्याला असलेल्या माहितीप्रमाणे खरे होते आणि त्यात हेतूत: वस्तूस्थिती दडवण्याचा किंवा असे चूकीचे विधान करण्याचा उद्देश नव्हता किंवा माहिती दडवणे विमाधारकाच्या माहितीच्या आवाक्यात होते, तर कोणताही विमाकर्ता फसवणूकीच्या आधारावर जीवन विमा पॉलिसी आपली असल्याचे नाकारू शकत नाही. नाकारण्याची जबाबदारी पॉलिसीधारकावर जर तो जिवंत असेल तर किंवा लाभार्थीवर आहे.
 
6. जीवनाच्या विमा पॉलिसीवर तीन वर्षाच्या दरम्यान या आधारावर हरकत घेता येऊ शकते की, कोणतेही विधान किंवा विमाधारकाच्या आयुर्मानाच्या संभाव्यतेची महत्वपूर्ण माहिती दडवून चूकीची माहिती प्रस्तावामध्ये किंवा ईतर आधारभूत दस्तऎवजांमध्ये देण्यात आली ज्याद्वारे पॉलिसी देण्यात, पुर्नज्जीवीत करण्यात आली किंवा रायडर देण्यात आला. यासाठी, विमाकर्त्याने विमाधारक किंवा विमाधारकाचा कायदेशीर प्रतिनिधी किंवा नामनिर्देशित व्यक्ती किंवा मुख्त्यार जे लागू होते यांच्याशी आधार आणि वस्तूस्थिती ज्यावर असा पॉलिसी नाकारण्याचा निर्णय आधारित आहे त्याचा उल्लेख करून लेखी स्वरूपात कळवले पाहिजे.
 
7. नाकारणे हे चूकीच्या विधानाच्या आधारावर आणि फसवणूकीच्या नाही या बाबतीत, नाकारण्याच्या तारखेपर्यंत पॉलिसीवर घेण्यात आलेले विम्याचे हप्ते नाकारण्याच्या तारखेपासून ९० दिवसांच्या कालावधीत विमाधारक किंवा विमाधारकाचा कायदेशीर प्रतिनिधी किंवा नामनिर्देशित व्यक्ती किंवा विमाधारकाचा मुख्त्यार याला परत देण्यात येतील.
 
8. विमाकर्त्याच्या जोखीम उचलण्यावर जोपर्यंत आधात होत नाही तोवर वस्तूस्थिती महत्वपूर्ण म्हणून समजता येणार नाही. हे दाखवण्याची जबाबदारी विमाकर्त्यावर राहील की, जर विमाकर्त्याला उपरोक्त वस्तूस्थितीची माहिती असती, तर विमाधारकाला जीवन विमा पॉलिसी जारी करण्यात आली नसती.
 
9. विमाकर्ता जर तसे करण्यास पात्र असेल तर तो वयाच्या पुराच्याची मागणी कधीही करू शकतो आणि कोणतीही पॉलिसी फक्त या कारणासाठी हरकत घेण्यासाठी मानण्यात येणार नाही की, पॉलिसीच्या शर्ती विमाधारकाच्या वयाच्या पुढील पुराव्याशी जुळवून घेण्यात आल्या आहेत. म्हणून, हे कलम वयाबाबत हरकत घेण्यासाठी किंवा नंतर देण्यात आलेल्या वयाच्या पुराव्यावर आधारित जुळणी बाबत लागू होणार नाही.
 
 
[अस्वीकरण: ही काही विमा (सुधारणा) कायदा, २०१५ प्रमाणे सुधारित विमा कायदा, १९३८ च्या कलम ४५ ची सर्वसमावेशक यादी नाही तर, फक्त सामान्य माहितीसाठी बनवण्यात आलेली सरलीकृत आवृत्ती आहे. पूर्ण आणि अचूक तपशिलासाठी पॉलिसीधारकांनी विमा (सुधारणा) कायदा, २०१५ पहावा असा आमचा सल्ला आहे.]
 

विमा (सुधारणा) कायदा, २०१५ प्रमाणे सुधारित सवलत मनाई विमा कायदा, १९३८ चे कलम ४१):

 
1)    1) कोणालाही एकाख्या व्यक्तीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या, भारतातील कोणत्याही जीवनांचा किंवा मालमत्तांच्या जोखीमीच्या संदर्भातील विमा, नविन किंवा नुतनीकरण किंवा चालू ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे किंवा देण्याच्या प्रस्ताव करता येणार नाही, देय कमिशन मधील संपूर्ण अथवा अंशत: भाग प्रलोभनाच्या स्वरूपात किंवा पॉलिसीमध्ये दाखविण्यात आलेल्या विमा हप्त्यामध्ये सवलत तसेच कोणालाही पॉलिसी घेणे, नुतनीकरण करणे किंवा चालुठेवणे यासाठी सवलत घेता येणार नाही अर्थात प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात किंवा तालिके प्रमाणे विमा कंपनीने देऊ केलेल्या सवलती वगळून. तथापी विमा प्रतिनिधीने स्वत:च्या आयुष्याच्या विम्यासाठी स्वत: काढलेल्या पॉलिसीवर घेतलेली दलाली ही विमा हप्त्यावर घेतली सवलत म्हणून मानण्यात येणार नाही, अशा स्विकृतीच्या वेळेच्या बाबतीत पोट-कलमाच्या या अर्थामध्ये विमा प्रतिनिधी विहित अटी पूर्ण करून हे प्रस्थापित करतो की तो एक विमा कंपनीने नोकरीवर ठेवलेला खरा प्रतिनिधी आहे.
 
2)    2) कोणतीही व्यक्ती या कलमाच्या तरतूदींच्या पालनामध्ये कसूर करेल ती दंडास जबाबदार असेल, जो दहा लक्ष रूपयांपर्यंत वाढवता येऊ शकतो.
 
टीप: “अटी लागू” ज्यासाठी कृपया पॉलिसी दस्तऎवज पहावा अथवा जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा.
 

बनावट फोन कॉल्स आणि खोट्या/फसव्या प्रस्तावांपासून सावध रहा.

 

ईर्डा सार्वजनिक स्पष्टीकरण करते की:


ईर्डा किंवा त्यांचे अधिकारी कोणत्याही प्रकारचा विमा किंवा अर्थिक उत्पादनांची विक्री करण्या सारख्या घडामोडींमध्ये गुंतत नाहीत किंवा हप्त्यांची गुंतवणूक करत नाहीत.

ईर्डा कोणताही बोनस जाहीर करत नाही.

कृपया असे फोन कॉल्स आलेल्या लोकांनी पोलीसांकडे फोन कॉल्स, नंबर या तपशिलासह तक्रार दाखल करावी.
 


 
नोंदणीकृत कार्यालय:

भारतीय आयुर्विमा महामंडळ,

मध्यवर्ती कार्यालय, योगक्षेम,

जीवन विमा मार्ग,

मुंबई-४०००२१.

वेबसाईट: www.licindia.in

नोंदणी क्रमांक: ५१२