मुख पृष्ठ » योजना » आम आदमी बिमा योजना » फायदे
फायदे

फायदे

i) नैसर्गिक मृत्यु

विमा संरक्षणाच्या कालमर्यादेत सदस्याचा मृत्यु झाल्यास नंतर प्रभावित असताना अश्वासन रक्कम रू.३०,००० नॉमिनीला देय होईल.

ii) अपघाती मृत्यु/अपंगतत्व्बाचा फायदा :

विमा संरक्षणाच्या कालमर्यादेत सदस्याच्या अपघाताच्या बाबतीत पुढील फायदे देण्यात आलेले आहेत.
अ) अपघातामुळे मृत्यु झाल्यास रू.७५,०००/-
ब) अपघातामुळे कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आल्यास रू.७५,०००/- i) अपघातात २ डोळे आणि २ अवयव निकामी किंवा
ii) अपघातात एक डोळा आणि एक अवयव निकामी झाल्यास रू.३७,५००/-

iii) शिष्यवृत्ती फायदा

हा एक वाढीव फायदा देण्यात आलेला आहे, जो लाभार्थीच्या इयत्ता ९ वी ते १२ वी च्या दरम्यान शिकणा-या जास्तीजास्त दोन मुलांना प्रत्येक मुलाला प्रति महिना अर्धवार्षिक पद्धतीने – प्रत्येक वर्षी १ जुलै आणि १ जानेवारी रोजी रू.१००/-च्या दराने देण्यात येईल.

6. क्लेम प्रक्रिया :

या योजनेखालील मृत्यु आणि अपंगत्वाचे क्लेम ‘एलआयसी’च्या P&GS Unit तर्फे लाभार्थींना ‘NEFT’च्या माध्यमातून जेथे ‘NEFT’ची सोय उपलब्घ आहे तेथे थेट रक्कम लाभार्थीला अदा करून आणि जेथे ’NEFT’ची सोय उपलब्घ नाही तेथी सक्षम अधिका-यांच्या पूर्व मंजूरीने अकाउंट पेई चेकच्या माध्यमातून मोकळे केले जातील किंवा क्लेम ‘एलआयसी’ निर्धारित इतर मार्गाने अदा केले जाऊ शकतील.

सदस्याच्या संरक्षण कालमर्यादेत आणि पॉलीसी प्रभावी असताना झालेल्या मृत्युच्या बाबतीत त्याच्या/तिच्या नॉमिनीला क्लेमच्या पेमेंटसाठी मृत्यु दाखल्यासहित नोडल एजन्सीच्या नियुक्क्त अधिका-याकडे अर्ज करावा लागेल.

नोडल एजन्सीचे नियुक्त अधिकारी क्लेमची कागदपत्रे सत्यापित करतील आणि ते मृत्यु दाखल्या सोबत आणि एक दाखला कि मयत सदस्य हा कुटुंबाचा कुटुंब प्रमुख/कमावता सदस्य होता जे कुटुंब गरीबी रेषेच्या खालील (BPL) / गरीबी रेषेच्या किंचित वर, पात्र व्यवसाया अंतर्गत या योजनेच्या बीपीएल कुटुंबाच्या पात्र व्यवसाया पैकी होता या सोबत दाखल करतील.
नोडल एजन्सीने अर्जा सोबत पुढील आवश्यक गोष्टी दाखल कराव्यात:

a) सर्वार्थाने परीपूर्ण क्लेम फॉर्म
b) मूळ मृत्युचा दाखला आणि सोबत साक्षांकित प्रत अपघाताच्या फायद्याच्या क्लेमसाठी पुढील अत्याधिक गोष्टी मृत्यु नोंदणी प्रमाणपत्रा सोबत दाखल कराव्या लागतील.:
प्रथम माहिती अहवाल (FIR) प्रत
पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट
पोलीस इनक्वेस्ट रिपोर्ट
पोलीस निष्कर्ष अहवाल/ अंतिम अहवाल

7. कायम स्वरूपी संपूर्ण अपंगत्वाचा फायदा :

हक्क सांगणा-याला अपघाताचा कागदोपत्री पुरावा दाखल करावाच लागेल, तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सरकारी जिल्हा शल्य चिकित्सक किंवा प्रमाणित सरकारी अस्थीरोगतज्ञाकडून कायम एकूण/अंशत: अपंगत्व अपघातामुळेच झालेले आहे, ज्यात या योजने अंतर्गत समाविष्ट केलेल्या सदस्याच्या अवयवांचे झालेले नुकसान सांगून प्रमाणित केलेले असेल.

प्रत्येक सदस्य त्याच्या मृत्युनंतर क्लेमची रक्कम प्राप्त करण्यासाठी एक नॉमिनी नियुक्त करेल. नॉमिनेशन फॉर्म हा सदस्यत्वाच्या अर्जाचा एक भाग आहे आणि त्यात क्लेमची रक्कम प्राप्त होण्यासाठी नॉमिनीचा सर्व तपशिल समाविष्ट आहे. ही कार्यपद्धती न चुकता अमलात आणावी, जेणे करून मृत्युच्या क्लेम निकाली काढताना कोणत्याही अडचण येणार नाही. नॉमिनेशन फॉर्म पंचायत/नोडल एजन्सी यांच्या ताब्यात ठेवण्यात येईल आणि सदस्याच्या मृत्युनंतर क्लेमच्या कागदपत्रांसोबत ’एलआयसी’कडे पाठविण्यात येईल.

8. शिष्यवृत्तीच्या क्लेमची कार्यपद्धती :

१) सद्स्या ज्याचे मुल शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल तो एक अर्धवार्षिक अर्ज भरेल आणि नोडल एजन्सीकडे दाखल करेल. नोडल एजन्सी विद्यार्थ्यांना ओळखून घेईल.

२. नोडल एजन्सी यामधून संबंधीत ”पीएण्डजीएसP&GS Unit’ कडे संपूर्ण तपशिलासहित लाभार्थि विद्यार्थ्यांची यादी जसे विद्यार्थ्याचे नाव , शाळेचे नाव, वर्ग, सदस्याचे नाव, मास्टर पॉलिसी क्रमांक, सदस्यता क्रमांक आणि थेट रक्कम अदा करण्यासाठी ”NEFT’चे तपशिल.

३. प्रति अर्धवार्षिक १ जुलैला आणि १ जानेवारीला लाभार्थि विद्यार्थ्यांच्या खात्यांवर शिष्यवृत्तीची रक्कम ’एलआयसी’ ’NEFT’द्वारे जमा करेल.

४. ईतर कोणताही शिष्यवृत्ती रक्कम अदा करण्याचा पर्याय जो ’एलआयसी’ / सरकारद्वारे सुनिश्चित होईल तो भविष्यात

आम आदमी विमा योजनेखाली
व्यवसाय / पेशाला लागू होईल

क्रम सं व्यवसाय क्रम सं व्यवसाय
1. बीडी कामगार 25. खांडसरी साखरेअ सारखे अन्न पदार्थ
2. विटभट्टी कामगार 26. कापड उद्योग
3. सुतार 27. लाकडी वस्तूंचे उप्तादक
4. चांभार 28. कागदी वस्तूंचे उप्तादक
5. मच्छिमार 29. चामड्याच्या वस्तूंचे उत्पादक
6. हमाल 30. प्रिंटींग
7. हस्तकला कलाकार 31. रबर आणि कोळश्याच्या वस्तू.
8. हातमाग विणकर 32. मेणबत्ती उत्पादना सारखी रासायनिक उत्पादने
9. हातमाग आणि खादी विणकर 33. मातीच्या खेळण्यासारखी खनिज उत्पादने
10. लेडीज टेलर्स 34. शेतकरी
11. लेदर आणि सुकवणी कामगार 35. वाहतूक वाहक संघटना
12. ’सेवा’ शी सलतग्न पापड कामगार 36. वहातूक कर्मचारी
13. अपंग स्वयंव्यवसायिक व्यक्ती 37. ग्रामीण गरीब
14. प्राथमिक दुध उत्पादक 38. बांधकाम कामगार
15. सायकल रिक्षा / ऑटो ड्राईव्हर 39. फटाका कामगार
16. सफाई कामगार 40. नारळ प्रोसेसर्स
17. मीठागार कामगार 41. आंगणवाडी शिक्षक
18. तेंदूपत्र गोळाकरणारे 42 .कोतवाल
19. शहरी गरीबांसाठीच्या योजना 43. मळ्यातील कामगार
20. जंगल कामगार 44 स्व:मदत गटांशी संबंधित स्त्रीया
21. रेशम्याच्या किड्याशी संबंधित व्यवसाय 45. मेंढी पालन
22 ताड़ी बनानेवाले 46 प्रवासी भारतीय कामगारों
23 यंत्रमाग कामगार 47* ग्रामीण भूमीहीन घरे
24 डोंगराळ भागातील स्त्रीया 48 राष्ट्रीय सुरक्षा बिमा योजना (RSBY) अंतर्गत असंघटित कामगार
*५०% विमा हप्ताची पूर्तता राज्य सरकार तर्फे.
Top