मुख पृष्ठ » आमच्या टीम मध्ये सामील व्हा » एक कार्पोरेट एजन्ट व्हा
एक कार्पोरेट एजन्ट व्हा

विमा उद्योग सुरू झाल्यापासून एक दशक बाजाराचा ७०% पेक्षा जास्त हिस्स्यावर अधिपत्य गाजवून सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव आयुर्विमा कंपनी असल्याचा दर्जा एलआयसी अभिमानाने बाळगते आहे, भारत सरकार भाग भांडवल धारक असल्या कारणाने एलआयसीच्या योजना सार्वभौम हमीनेच येतात.

भारताच्या एलआयसी ने बॅन्काशुरन्स एण्ड अल्टरनेट चॅनल सन २००१ मध्ये चालू केले. आजतागायत आमच्या ११ सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका आणि ४६ विभागीय ग्रामीण, खाजगी आणि सहकारी बॅंका आणि ७२ कार्पोरेट एजन्टस आमच्या बॅन्काशुरन्स एण्ड अल्टरनेट चॅनलचे सहकारी म्हणून आहेत.

आमच्या पॅन इण्डीया नेटवर्कमध्ये ११३ विभागीय कार्यालये, २०४८ शाखा आणि १३८१ उपग्रह कार्यालये आहेत, आमच्याशी व्यवसाय करताना आपल्या फारच सोपे आणि सोईस्कर वाटेल.

आयआरडीआय च्या विनियमांच्या कार्पोरेट एजन्टांच्या नोंदणीच्या दृष्टीकोनातून, जे १.४.२०१६ पासून प्रत्यक्षात येईल, आम्ही आपले (नोंदणीकृत कंपनी, बॅंक, एनबीएफसी, सह.सोसायटी, भागीदारी संस्था इत्यादी.) भारतातील सर्वात विश्वसनीय आयुर्विमा कर्ता जो २६ कोटी ग्राहकांना सेवा देत आहे त्याच्या बरोबर काम करण्यासाठी आणि एलआयसीच्या कुटुंबाचाच एक भाग बनण्यासाठी स्वागत करतो.  

पुढील पत्त्यावर संपर्क साधण्यासाठी आपले स्वागत आहे:

भारतीय आयुर्विमा महामंडळ,
बॅन्काशुरन्स एण्ड अल्टरनेट चॅनल, मध्यवर्ती कार्यालय,
योगक्षेम, ६ वा मजला लिंक,
नरीमन पॉईंट, मुंबई – ४०० ०२१.
ईमेल: corporate.enquiry@licindia.com

 

Top