मुख पृष्ठ » तळातील दुवे » सुवर्ण महोत्सची फाउंडेशन » आमच्या बद्दल
आमच्या बद्दल

आमच्या बद्दल

एलआयसी सुवर्ण महोत्सवी फाउंडेशन

कार्पोरेट घराण्यांच्या भूमिकेत महत्वाची घडामोड म्हणजे त्यांनी कार्पोरेट सामाजिक जबाबदारीवर लक्ष केंद्रित केलेले आहे. कार्पोरेट सामाजिक जबाबदारी म्हणजे व्यवसायाची नैतिकदृष्ट्या वर्तनकरून आणि स्थानिक समाज आणि एकूण समाजाच्या तसेच काम करणा-यांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करत असताना आर्थिक सुधारणांमध्ये योगदान देण्याची सततची बांधीलकी आहे

एक जबाबदार कार्पोरेट नागरिक म्हणून एलआयसी आपल्या सामाजिक जबाबदा-या वेळोवेळी पूर्णकरीत आली आहे. एलआयसीच्या सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून एलआयसी सुवर्ण महोत्सवी फाउंडेशनची स्थापना २०.१०.२००६ रोजी करण्यात आली. फाउंडेशनची धर्मदाय आयुक्त मुंबई यांच्याकडे नोंदणी करण्यात आली आहे आणि आयकर कायद्याच्या कलम ८०जी अंतर्गत सूट देखील प्राप्त करण्यात आली आहे.

शिक्षण, आरोग्य, दुख: आणि दारिद्र्यापासून मुक्तता यांचा प्रसार आणि सर्वसामान्यांच्या उपयुक्ततांमध्ये सुधारणा ही एलआयसी सुवर्ण महोत्सवी फाउंडेशनचे उद्दिष्टे आहेत

एलआयसी सुवर्ण महोत्सवी फाउंडेशन कार्पोरेट पातळीवर आमच्या सामाजिक जबाबदा-या आणि वैय्यक्तिक पातळीवर परोपकारी गरजा पूर्ण करण्याचा एक महान मार्ग प्रदान करू शकते.

फाउंडेशनने दवाखाने, शाळा, इमारती आणि वर्ग, ग्रंथालय, संगणक केंद्र, वृद्धाश्रम, आदिवासी भागातील मुलांसाठी वसतीगृह इमारती यासारख्या विविध बांधकाम प्रकल्पांच्या माध्यमातून आधार दिलेला आहे. देशाच्या विविध भागातील गरजूंसाठी एक पायाभूत सुविधा देण्यासाठी विकलांग व्यक्तिंसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे. आम्ही विकलांग मुलांच्या शाळांना स्कुलबस आणि रूग्णांना रूग्णालयात नेण्याच्या वहातूकीसाठी रूग्णवाहिका यांच्या खरेदीसाठी निधी दिलेला आहे. फाउंडेशनने संपूर्ण देशामधील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाच्या वर्गातील मुलांसाठी कोचलर उपकरणे बसवण्याच्या कार्यक्रमाला केईएम रूग्णालय, पुणे यांच्या माध्यमातून मदत केलेली आहे. एलआयसी सुवर्ण महोत्सवी फाउंडेशन जेथे नैसर्गिक आपत्तींनी मानवी जीवन उध्वस्त केलेले आहे अशा भागापर्यंत पोचलेले आहे आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निराधार मुलांना पायाभूत सुविधांचा आधार देण्यात आलेला आहे. आमच्याकडून आधारदेण्यात आलेल्या प्रकल्पांची यादी उपक्रम आणि प्रकल्प तपशीलाच्या दुव्यांतर्गत उपलब्ध आहे. 

पात्रता तरतूदी आणि अर्ज करण्याची

करण्याची पद्धत अर्थपुरवठा करावयाची संस्था धर्मदाय कार्यातव्यस्त एक प्रतिष्ठीत आणि किमान तीन वर्षे नोंदणीकृत गैर सरकारी संस्था असावी. संस्थेकडे पॅनकार्ड असावे आणि आयकर कायदा१९६१ च्या कलम ८०जी(५) अंतर्गत सूट प्राप्त करण्यात आलेली असावी आणि आयकर कायदा १९६१ च्या कलम १२ ए अंतर्गत नोंदणीकृत असावी.

अर्ज विहीत नमुन्यामध्ये त्यात नमूद जोडपत्रांसहित जेथे नियोजीत प्रकल्प होणार आहे त्यापासूनच्या एलआयसीच्या सर्वातजवळच्या विभागाकडे दाखल करण्यात यावेत. अर्जाचा नमुना सर्वातजवळच्या विभागीय कार्यालयातून प्राप्त करता येऊ शकेल.

 
विश्वस्त
 

एलआयसी सुवर्ण महोत्सवी फाउंडेशनच्या संचालक मंडळाचे सदस्य पुढील प्रमाणे आहेत

  1. श्री वी.के. शर्मा, ट्रस्टी
  2. श्रीमती. उषा सांगवान, ट्रस्टी
  3. श्री हेमन्त भार्गव, ट्रस्टी
  4. श्रीमती सुनीता शर्मा, ट्रस्टी
Top