मुख पृष्ठ » योजना » विमा योजना » नविन टर्म एशुअरन्स रायडर » पात्रता अटी आणि इतर बंधने
पात्रता अटी आणि इतर बंधने

पात्रता अटी आणि इतर बंधने

आरंभाच्यावेळी किमान वय : १८ वर्षे (पूर्ण)
आरंभाच्यावेळी कमाल वय : ६० वर्षे (सर्वात जवळचा वाढदिवस)
संरक्षणछत्र समाप्तीचे कमाल वय  :    ७५ वर्षे (सर्वात जवळचा वाढदिवस)
रायडरची मुदत :   ५ ते ३५ वर्षे
किमान टर्म एशुरन्स रायडर सम एशुअर्ड : रू. १००,०००/-
कमाल टर्म एशुरन्स रायडर सम एशुअर्ड :   रू. २५,००,०००/-कमाल टर्म एशुरन्स रायडर सम एशुअर्ड ही मूळ योजने अंतर्गत जोडल्या बेसीक सम एशुअर्ड / सम एशुअर्ड / सम एशुअर्ड (आरोग्य योजना) यांच्या पेक्षा कमी किवा समतुल्य असेल, परंतू महामंडळाकडून घेण्यात आलेल्या विमाधारकाच्या विचाराधीन प्रस्तावासह अस्तीत्वातील सर्व पॉलिसी खालील टर्म एशुरन्स रायडरच्या एकूण २५ लाखांच्या मर्यादेचे उल्लंघन करणारी नसेल.

विमा ह्प्ता भरण्याची पद्धत: मूळ योजनेप्रमाणे जीला रायडर जोडण्यात आलेला आहे.

विमा हप्त्याचे नमुनादर:
खालील विम्याच्या हप्त्याच्या तक्त्याचे काही नमुना दर (सेवाकर वगळता) प्रति रू. १०००/- टर्म एशुरन्स रायडर सम एशुअर्डसाठी


वार्षिक नियमीत विमा हप्ता (रूपयात)

 

वय
(वर्षामध्ये)

पॉलिसीची मुदत (वर्षांमध्ये)

१०

२०

३०

२०

१.६१

१.६१

१.८९

३०

१.८८

२.४४

३.५१

४०

३.६७

५.५२

७.६३

५०

९.१८

१२.६१

--

वार्षिक मर्यादित विमाहप्ता (रूपयात) :


वय
(वर्षात)

पॉलिसीची मुदत = १० वर्षे

पॉलिसीची मुदत = २० वर्षे

पॉलिसीची मुदत = ३० वर्षे

पीपीटी=५

पीपीटी=९

पीपीटी= १०

पीपीटी=१५

पीपीटी=१०

पीपीटी=२०

२०

२.६२

१.६१

२.४९

१.८८

३.६७

२.३०

३०

३.२३

१.९६

३.८७

२.९२

६.७६

४.२६

४०

६.३०

३.८३

८.६७

६.५६

१४.३१

९.१२

५०

१५.५८

९.५६

१९.३०

१४.८०

--

--

एकल विमाहप्ताअ (रूपयात):


  वय
 (वर्षात)

पॉलिसीची मुदत (वर्षात)

१०

२०

३०

   २०

१०.८१

१७.७७

२६.१५

   ३०

१३.३६

२७.५७

४८.१४

   ४०

२५.९६

६१.३६

१०१.३४

   ५०

६३.७६

१३४.०५

--


विमाहप्ता भरणा पद्धत आणि उच्च विमा राशीवर सुट:
»पद्धत सूट: मूळ योजनेप्रमाणे
»उच्च सम एशुअर्ड सूट : काही नाही.


वाढीव मुदत : मूळ योजनेप्रमाणे म्हणजे एक महिन्याचा पण ३० दिवसांपेक्षा कमी नसलेली वाढीव मुदत वार्षिक, सहामाही किंवा त्रैमासिक रायडरचा विमाहप्ता भरण्यासाठी आणि मासिक विमा हप्त्यांसाठी आणि रायडरचा विमाहप्ता दरमहा भरण्यासाठी १५ दिवसांच्या वाढीव मुदतीची परवानगी असेल


पेड-अप व्हॅल्यु: टर्म एशुरन्स रायडरला कोणतीही पेड-अप व्हॅल्यु प्राप्त होणार नाही.

सरेंडर व्हॅल्यु: या रायडर अंतर्गत कोणतीही सरेंडर व्हॅल्यु उपलब्ध होणार नाही. तथापि ज्या मूळ पॉलिसीला रायडर जोडलेला आहे ती
समर्पीत झाल्यावर, जर या रायडरच्या बाबतीतील सर्व देय विमाहप्ते भरण्यात आलेले असतील, संरक्षणछत्रा बाबतचे आकारण्यात आलेले अतिरिक्त रायडर विम्याचे हप्ते पीपीटी पश्चात पुढील प्रमाने परत करण्यात येतील:


नियमीत विमाहप्ता भरणा पॉलिसीज: काहीही परत करण्यात येणार नाही.

मर्यादित विमाहप्ता भरणा पॉलिसीज: १० वर्षांपेक्षा कमी विमाहप्ता भरण्याच्या मुदतीसाठी पहिल्या सततच्या दोन वर्षात संपूर्ण विम्याचे हप्ते भरण्यात आलेले असतील, १० वर्षे आणि त्यापेक्षा जास्त विमाहप्ता भरण्याच्या मुदतीसाठी पहिल्या सततच्या तीन वर्षात संपूर्ण विम्याचे हप्ते भरण्यात आलेले असतील, तर परतावा देय होईल.


एकल विमाहप्ता पॉलिसीज:
रायडरच्या मूळ मुदतीशी रायडरच्या शिल्लक राहिलेल्या मुदतीचे प्रमाण गुणीले ९०% रायडरचा एकल विमाहप्ता एवधी रक्कम परत करण्यात येईल.


पुनरूज्जीवन:
विमा पुढे चालू ठेवण्याच्या योग्यतेचा समाधानकारक पुरावा सादर करण्याच्या अधिन राहून एक समाप्त झालेल्या रायडरचे मूळ पॉलिसी सोबतच पहिल्या न भरलेल्या विमाहप्त्याच्या तारखेपासून परंतू या रायडर अंतर्गत संरक्षणछत्र समाप्ती वयाच्या आधी दोन वर्षांच्या मुदतीत व्याजासह बाकी असलेले विमाहप्ते भरून पुररूज्जीवन करता येईल, रायडारचे पुनरूज्जीवन मूळ पॉलिसीबरोबरच करता येईल, स्वतंत्रपणे नाही. लागू असणारे व्याजाचे दर महामंडळाकडून वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे.


कर:
जे असतील ते सेवाकरासहीत कर, कर कायदा आणि करांचे दर वेळेवेळी जे असतील ते, लागू होतील.

पॉलिसी धारकाला ज्या असतील त्या जास्तीच्या विम्याच्या हप्त्यासह विम्याच्या ह्प्त्यावरील प्रचलित दरानुसार असलेले कर देय असतील. या योजनेखाली फायद्यांची आकडेमोड करताना करापोटी भरण्यात आलेली रक्कम विचारात घेतली जाणार नाही.


कूलिंग-ऑफ पिरीयड:जर पॉलिसीधारक रायडरच्या “शर्ती आणि अटीं” बाबत असमाधानी असेल तर रायडार महामंडळाला पॉलिसी मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात आक्षेपाचे कारण दाखवून परत करता येईल. ती मिळाल्यावर महामंडळ रायडार रद्द करेल आणि भरणा करण्यात आलेल्या रायडर विमाह्प्त्यांची रक्कम परत करण्यात आलेली पॉलिसी मिळण्याच्या तारखेपर्यंतच्या संरक्षणाखालील काळाचा प्रमाणबद्ध विमा हप्ता जो असेल तो रायडरचा अंतर्भाव करण्यासाठीच्या वैद्यकीय परिक्षण अहवाल, विशेष अहवाल आणि मुद्रांक शुल्क यांचा खर्च, वजा जाता परत करेल.


अपवर्जन:

आत्महत्या: हा रायडर स्वतंत्रपणे देता येणार नाही आणि मूळ योजनेला जोडलेला असेल. आत्महत्येच्या क्लेमची तरतूद रायडरच्या बाबतीतील मूळ योजनेत नमूद केल्याप्रमाणे लागू होईल.


विमा कायदा, १९३८ चे कलम ४५:
कोणत्याही आयुष्याच्या विम्याच्या पॉलिसीवर ती प्रभावी झाल्याच्या तारखेपासून दोन वर्षाची मुदत संपल्यानंतर विमा कंपनीला या आधारावर हरकत घेता येणार नाही की, विम्याच्या प्रस्तावामध्ये करण्यात आलेले एखादे विधान किंवा एखाद्या वैद्यकीय अधिका-याच्या अहवालामध्ये किंवा पंच किंवा विमाकर्त्याचा मित्र किंवा एखादा दस्तऎवज ज्या द्वारे पॉलिसी देण्यात आली ती माहिती चुकीची किवा खोटी होती. जोपर्यंत विमा कंपनी हे दाखवत नाही की, असे विधान हे महत्वपूर्ण होते किंवा जी महत्वपूर्ण माहिती उघड करावयाची होती ती दडवून ठेवण्यात आले किंवा पॉलिसीधारकाने ती फसवणुकीने दिलेली आहे आणि पॉलिसीधारकाला माहिती देताना हे माहित होते की ती खोटी होती किंवा दडवण्यात आलेली वस्तूस्थिती जाहीर करण्यासाठी होती.


असे असले तरी या कलमामध्ये असे काहीही नाही जे विमा कंपनीला तो त्याचा हक्क असेल तर वयाच्या पुराव्याची कोणत्याही वेळी मागणी करण्यासाठी रोखू शकते, आणि कोणतीही पॉलिसी हरकत घेण्यासाठी मानण्यात येणार नाही, फक्त या कारणासाठी की पॉलिसीच्या अटी नंतरच्या पुराव्या प्रमाणे जुळवून घेतल्या आहेत की विमाकर्त्याच्या वयाचा पुरावा प्रस्तावामध्ये चूकीचा देण्यात आलेला आहे.


विमा कायदा, १९३८ चे कलम ४१:
कोणालाही एकाख्या व्यक्तीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या, भारतातील कोणत्याही जीवनांचा किंवा मालमत्तांच्या जोखीमीच्या संदर्भातील विमा, नविन किंवा नुतनीकरण किंवा चालू ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे किंवा देण्याच्या प्रस्ताव करता येणार नाही, देय कमिशन मधील संपूर्ण अथवा अंशत: भाग प्रलोभनाच्या स्वरूपात किंवा पॉलिसीमध्ये दाखविण्यात आलेल्या विमा हप्त्यामध्ये सवलत तसेच कोणालाही पॉलिसी घेणे, नुतनीकरण करणे किंवा चालुठेवणे यासाठी सवलत घेता येणार नाही अर्थात प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात किंवा तालिके प्रमाणे विमा कंपनीने देऊ केलेल्या सवलती वगळून. तथापी विमा प्रतिनिधीने स्वत:च्या आयुष्याच्या विम्यासाठी स्वत: काढलेल्या पॉलिसीवर घेतलेली दलाली ही विमा हप्त्यावर घेतली सवलत म्हणून मानण्यात येणार नाही, आशा स्विकृतीच्या वेळेच्या बाबतीत पोट-कलमाच्या या अर्थामध्ये विमा प्रतिनिधी विहित अटी पूर्ण करून हे प्रस्थापित करतो की तो एक विमा कंपनीने नोकरीवर ठेवलेला खरा प्रतिनिधी आहे.


कोणतीही व्यक्ती या कलमाच्या तरतूदींच्या पालनामध्ये कसूर करेल ती पाचशे रूपया पर्यंतच्या दंड शिक्षेस पात्र असेल.

टिप:- “अटी लागू” ज्यासाठी कृपया पॉलिसी दस्तऎवज पहावा अथवा जवळच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा.
 

विमा ही आग्रहाची विषय वस्तू आहे

नोंदणीकृत कार्यालय:

भारतीय आयुर्विमा महामंडळ,
मध्यवर्ती कार्यालय, योगक्षेम,
जीवन विमा मार्ग,
मुंबई-४०००२१.वेबसाईट: www.licindia.in
नोंदणी क्रमांक: ५१२

Top